Thane Water Cut : ठाण्यातील काही भागात होणार पाणी कपात

पाणी कपातीच्या नंतरचे पुढचे दोन दिवस पाण्याचे प्रेशन कमी राहाणार आहे अशी सूचना ठाणे महानरपालिकेने नागरिकांना दिली आहे.

241
Thane Water Cut : ठाण्यातील काही भागात होणार पाणी कपात

ठाणे जिल्ह्यातल्या काही भागातील पाणीपुरवठा (Thane Water Cut) या आठवड्याच्या अखेरीस बंद करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार शनिवार ६ मे रोजी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘हे’ आहे कारण

उथळसर वॉर्डमधील जेल जलकुंभाची इनलेट जलवाहिनी काही दिवसांपूर्वी बंद पडली होती. ठाण्यातल्या के – विला नाल्याचे काम चालू असताना हा प्रकार घडला होता. बंद असलेली ही जलवाहिनी दुरूस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाण्यातील काही विभागांत १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद (Thane Water Cut) करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे संभाजीनगर मधील नागरिक हैराण; अनेक जण जखमी)

या’ भागांना इशारा

– श्रीरंग सोसायटी परिसर
– राबोडी १
– राबोडी २
– पंचगंगा
– आकाशगंगा
– पोलीस लाईन
– टेंभीनाका
– ठाणे जेल
– आरटीओ परिसर
– धोबी लेन
– सिव्हील हॉस्पिटल

हेही पहा –

पुढचे दोन दिवस ..

पाणी कपातीच्या नंतरचे पुढचे दोन दिवस पाण्याचे प्रेशन कमी राहाणार आहे अशी सूचना ठाणे महानरपालिकेने नागरिकांना दिली आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करा. (Thane Water Cut)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.