‘या’ 26 औषधांमुळे होऊ शकतात कॅन्सरसारखे आजार,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली यादी

काही औषधे ही आपल्याला मेडिकलमध्ये कोणत्याही प्रिस्किप्शनशिवाय घेता येतात. पण अनेकदा अशी औषधे घेणे आरोग्याला धोकादायक असून अनेकदा त्याचे दुष्परिणाम देखील होत असतात. अनेक अशी औषधे आहेत ज्यांमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील संभवतात. त्यामुळे याची दखल घेत केंद्र सरकारने अशा एकूण 26 औषधांना महत्वाच्या औषधांच्या यादीतून हटवले आहे. त्यांची नावे देखील केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहेत.

26 औषधे यादीतून हटवले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून मंगळवारी महत्वाच्या औषधांची यादी(NLEM) जारी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 384 ऑषधांचा समावेश करण्यात आला आहे. यामधून सरकारने 26 औषधे काढून टाकली आहेत. अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीनला या यादीतून वगळण्यात आले आहे. रॅनिटिडीनमुळे कॅन्सरचा धोका संभवत असल्याची माहिती समोर आल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(AIIMS)शी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

रॅनिटिडीन औषधावर 2019 पासून संशोधन करण्यात येत आहे. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाला यामध्ये कॅन्सरला पोषक असणारे अॅसिड आढळल्यामुळे यामुळे कॅन्सरचा धोका असून रॅनिटिडीनशिवाय इतर अनेक औषधांना या यादीतून बाहेर काढण्यात आले आहे.

या औषधांना यादीतून केले हद्दपार

 1. अल्टेप्लेक्स
 2. अॅटेनोलोल
 3. ब्लिचिंग पावडर
 4. कॅप्रोमायसिन
 5. सेट्रिमाइड
 6. क्लोरफेनिरामाइन
 7. दिलोक्सॅनाइड फ्यूरोएट
 8. डिमेरकाप्रोलो
 9. एरिथ्रोमायसीन
 10. एथिनील एस्ट्राडियोल
 11. एथिनील एस्ट्राडियोल(ए) नोरेथिस्टरोन (बी)
 12. गॅनिक्लोवीर
 13. कनामायसीन
 14. लॅमिवुडिन(ए)+नेविरापीन(बी)+स्टावूडीन(सी)
 15. लेफ्लुनोमाइड
 16. मेथिल्डोपा
 17. निकोटिनामाइड
 18. पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2ए,पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2बी
 19. पेंटामिडाइन
 20. प्रिलोकेन(ए)+लिग्नोकेन(बी)
 21. प्रोकार्बाजिन
 22. रॅनिटिडीन
 23. रिफाब्यूटिन
 24. स्टावूडीन(ए)+लॅमिवुडीन(बी)
 25. सुक्रालफेट
 26. पेट्रोलेटम

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here