कोरोनाचे संकट! ‘या’ राज्यांमध्ये मास्कसक्ती, २ दिवस मॉकड्रिल

103

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच आता देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्य सरकारसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीतून विविध राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यानंतर आता देशातील ३ राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. केरळमधील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

( हेही वाचा : अवकाळी पावसाचा हाहाकार! पुढच्या ५ दिवसांसाठी हवामान विभागाकडून इशारा)

यापूर्वीच नीती आयोगाने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. परंतु आता पुन्हा एकदा वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन करावे लागू नये यासाठी खबरदारी म्हणून काही राज्यांमध्ये मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. रविवारी संपूर्ण देशात नव्या ५ हजार ३५७ रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनाचे ३२ हजार ८१४ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच शेवटच्या २४ तासांमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मास्क अनिवार्य

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळ, हरियाणा, पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सोमवार व मंगळवारी संपूर्ण देशभरात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.

पुद्दुचेरी प्रशासनाने तात्काळ सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. रुग्णालय, हॉटेल्स, रेस्टॉरंट, दारूची दुकाने, मनोरंजन क्षेत्रे, सरकारी कार्यलयांमध्ये कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे आवश्यक असल्याचे निवदेनातून स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.