मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर पुन्हा अलर्टवर

108

राज्यात आता कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा डोकेवर काढत आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने राज्य सरकारला याबाबतचे पत्र पाठवल्यानंतर रविवारी आणि सोमवारी राज्यात दर दिवसाला आढळून येणारे रुग्ण आता नऊशेच्या घरात पोहोचले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर या चार प्रमुख जिल्ह्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

( हेही वाचा : पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती! )

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात 660 रुग्णांचा आकडा होता. 19 एप्रिल रोजी दिवसभरात 137 रुग्ण आढळले. दोन दिवसांनी 179 रुग्ण दिवसभरात आढळले. सोमवारी 25 एप्रिल रोजी राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 929 पर्यंत पोहोचली. वाढत्या केसेस लक्षात घेता जनुकीय चाचणीची संख्या वाढवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

कोरोनाची वाढती आकडेवारी

  • 19 एप्रिल – 137 नव्या रुग्णांची नोंद. राज्यात एकूण 660 रुग्ण आढळले
  • 20 एप्रिल – 162 नव्या रुग्णांची नोंद. राज्यात एकूण 690 रुग्ण आढळले
  • 21 एप्रिल – 179 नव्या रुग्णांची नोंद. राज्यात 762 एकूण रुग्ण नोंदवले गेले.
  • 22 एप्रिल – 121 नव्या रुग्णांमुळे राज्यातील रुग्णसंख्या 817 पर्यंत पोहोचली.
  • 23 एप्रिल – 194 नव्या रुग्णांमुळे राज्यातील रुग्णसंख्या 869 पर्यंत पोहोचली.
  • 24 एप्रिल – 144 नवे रुग्ण आढळले. राज्यातील रुग्णसंख्या थेट 916 पर्यंत पोहोचली.
  • 25 एप्रिल -84 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात एकूण कोरोनाची रुग्णसंख्या 929 पर्यंत पोहोचली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.