केरळात वार्षिक तारखेपूर्वीच दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वा-यांना पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यात उद्यापासून काही जिल्ह्यांत वावटळ आणि मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
( हेही वाचा: भारतीय सैन्याने पोर्तुगालांकडून असा ताब्यात घेतला ‘गोवा’; जाणून घ्या गोव्याचा रोचक इतिहास )
या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाला मुक्काम
कोल्हापूर, सातारा, सांगलीसह दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत सोमवारपासून चार दिवस पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद सोमवार ते बुधवारपर्यंत पूर्वमोसमी पावसाचा मुक्काम राहील, तर बीडमध्ये मंगळवारपासून पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर अजून एक दिवस पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community