…तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन!

160

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम हे विविध अ‍ॅप्स सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात संवाद साधण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे कंपनीकडून खोटी माहिती, फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली जात आहे.

( हेही वाचा : मोठी नोकरभरती होणार, पगारही वाढणार! )

अशा नियमांबाबत आपण माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन होऊ शकते.

  • व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या युजर्सची तक्रार केल्यास संबंधित खाते बॅन होऊ शकते.
  • युजर्सनी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, त्रास देणारे, द्वेष करणारे मेसेज करू नये यामुळे अकाउंट बॅन होण्याची शक्यता असते.
  • व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील चित्रफित (पॉर्न क्लिप) शेअर करण्यावर बंदी घातली आहे. अशी क्लिप शेअर केल्यास युजर्स अडचणीत येऊ शकते.
  • GBWhatsapp, Whatsapp Delta, Whatsapp Plus यासारख्या तृतीय पक्षीय अ‍ॅप्सचा वापर केल्याने तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते कायमचे बंद होऊ शकते. अशा थर्ड पार्टी अ‍ॅप्समुळे युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक होतो. त्यामुळे अशा अ‍ॅप्सपासून दूर राहण्याचा सल्ला कंपनीने युजर्सला दिला आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप कोणीही हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे अटक व दंडही आकाराला जाऊ शकतो.
  • फेक न्यूज पाठवू नका प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करताना त्याची सत्यता तपासून घ्या. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर फेक अकाउंट बनवून लोकांना त्रास देऊ नका यामुळे तुमचे खाते बॅन होऊ शकते.
  • स्पॅम म्हणजे मेसेज पाठवण्यासाठी ब्रॉडकास्टिंग लिस्ट किंवा ग्रुप तयार करणे. ऑटो-मेसेजिंग, ऑटो-डायलिंग इत्यादी बेकायदेशीर किंवा अयोग्य संप्रेषणात असल्याचे आढळल्यास तुमचे WhatsApp Account देखील बंद केले जाईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.