
रामाच्या अस्तित्वाच्या खुणा असलेली अयोध्येतील 'ही' स्थाने
1 of 4

अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी गुप्त हरि घाट आहे. शरयू नदीमध्ये याच ठिकाणी श्रीरामाने अवतारकार्याची समाप्ती केली. हरि गुप्त झालेला घाट म्हणून याला 'गुप्त हरि घाट' असे म्हटले जाते. नंतर याचाच अपभ्रंश 'गुप्तार घाट' असा केला गेला.

कनक भवन हे मंदिर भगवान राम आणि सीतामातेला समर्पित आहे. हे भवन कैकेयी मातेने सीतेला तिच्या विवाहानंतर सूनमुख म्हणून भेट दिलेले आहे.

राम की पैडी : हे शरयू नदीच्या तिरावरील एक स्थान आहे. याच ठिकाणाहून श्रीराम शरयूमध्ये स्नानासाठी जात असत, अशी मान्यता आहे.

हनुमानगढी : अयोध्येतील हनुमानगढीचे महात्म्य असे आहे की, रामलल्लाच्या दर्शनाला येणारे भक्त हनुमानगढीला भेट देऊनच रामजन्मभूमीवर दर्शनासाठी येतात. प्रभु श्रीराम लंकेतून अयोध्येत परतले, तेव्हा त्यांनी हे स्थान आपल्या हनुमंताला दिले होते. विजयाचे प्रतीक म्हणून लंकेतून आणलेल्या खुणा येथे ठेवल्या आहेत. हनुमानगढी मंदिरात एक विशेष 'हनुमान निशान' आहे, जो चार मीटर रुंद आणि आठ मीटर लांब ध्वज आहे. यासोबत एक गदा आणि एक त्रिशूळ आहे.