त्यांनी बीडचा बिहार नाही, तर हमास, तालिबान केला; पुण्यातील जनआक्रोश मोर्च्यात Suresh Dhas आक्रमक

77
त्यांनी बीडचा बिहार नाही, तर हमास, तालिबान केला; पुण्यातील जनआक्रोश मोर्च्यात Suresh Dhas आक्रमक
त्यांनी बीडचा बिहार नाही, तर हमास, तालिबान केला; पुण्यातील जनआक्रोश मोर्च्यात Suresh Dhas आक्रमक

जोपर्यंत संतोष देशमुखचे (Santosh Deshmukh) मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा (Beed) बिहार नाही तर हमास, काबुलीस्तान आणि तालिबान केला आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घ्यायचा नसेल, तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा. या आधी अनेकांनी राजीनामा दिले. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.

(हेही वाचा – New Edward Bakery बेकरीच्या पावामध्ये सापडली स्टेपलरची पिन)

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

सुरेश धस (Suresh Dhas) पुढे म्हणाले की, मला मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून मी बोलतो, असे नाही. तुम्ही म्हणाल, तर मी शांत बसतो किंवा घाना देशात जाऊन रहातो; पण मग संतोष देशमुखला परत आणू शकाल का ? संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला; पण अजून त्याच्या कुटुंबियांना रहायला घर नाही. त्यांना न्याय मिळालं पाहिजे, यात कसलं राजकारण आहे?

सुरेश धस म्हणाले की, मी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली नाही. पण यांनी घेरा घातलाय त्यांना. अजित दादा डोळे उघडून खाली बघा काय सुरू आहे ते. बारामती मतदारसंघातील तुमच्या विश्वासातली माणसे बीड जिल्ह्यात पाठवा म्हणजे सत्यता समोर येईल, असे आवाहन धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.