कुरियर बॉय बनून चोरी करून गेला! पोलिसांनी ५ तासात पकडला! 

अटक करण्यात आलेल्या ३ चोरांपैकी विक्रम यादव याचे मेडिकल स्टोर्स आहे, तर अजय यादव याचा इंटिरियर डिझायनिंगचा धंदा आहे. 

80

कुरियर बॉय बनून एक भामटा चोर जोगेश्वरी येथे एका घरात घुसला आणि घरातील एकट्या महिलेवर चाकूचे वर करून घरातील रक्कम घेऊन पळून गेला, त्यानंतर मात्र पोलिसांनी अवघ्या ५ तासांत त्या चोराला गजाआड केले.

महिलेने आरडाओरडा केला आणि चोराने पोबारा केला!

जोगेश्वरी, सॅटेलाईट पार्क येथे एका फ्लॅटमध्ये राजेश आणि सुशीला यादव हे दाम्पत्य राहते. १६ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे राजेश सकाळी क्लिनिकमध्ये गेले असता एक कुरियर बॉय घरी आला आणि पार्सल असल्याचे सांगू लागला, मात्र सुशीला यादव यांनी आपण कोणतेही पार्सल मागितले नसल्याचे सांगितल्यावर, राजेश यादव यांच्या नावाचे असल्याचे सांगत सुशीला यांना विश्वासात घेतले. त्यामुळे सुशीला यांनी सेफ्टी दरवाजाही उघडला आणि सही करण्यासाठी पेन आणायला घरात गेल्या असता संबंधित कुरियर बॉय घरात घुसून चाकूचा धाक दाखवून घरातील १ हजार रुपयांची रक्कम चोरून पळून जाऊ लागला, मात्र सुशीला यादव यांनी प्रतिकार केला असता चोराने त्यांच्या हातांवर वार केले, जखमी अवस्थेतही सुशीला यांनी दरवाजाकडे येऊन आरडाओरडा केला असता, शेजारील धावून आले, चोराने पोबारा केला, तेव्हा त्या चोराबरोबर त्याचा साथीदारही होता.

(हेही वाचा : अहो आश्चर्यम्… दुसरी लस न घेताच मिळते लसीचे प्रमाणपत्र!)

एका चोराचे मेडिकल स्टोर्स, तर दुसऱ्याचा इंटिरियर डिझायनिंगचा धंदा

घडल्या प्रकरणानंतर सुशीला  यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथक आणि एटीसी पथकाच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या २ चोरांना अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरोधात कलम 394,452,34 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विक्रम शिवनाथ यादव (वय 33), अजय राजेंद्र यादव आणि राजेश गुज्जू यादव अशी चोरांची नवे असून विशेष म्हणजे विक्रम यादव याचे मेडिकल स्टोर्स आहे तर अजय यादव याचा इंटिरियर डिझायनिंगचा धंदा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.