मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एका चित्याचा मृत्यू झाला आहे. इतर चित्त्यांशी झालेल्या झुंजीत दक्षा नामक मादीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता याठिकाणी केवळ १७ चित्ते शिल्लक राहिले आहेत.
(हेही वाचा – Accident : पुण्यात खासगी बसला भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू)
आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एका चित्ताचा मंगळवारी, ९ मेला दुपारी १२ वाजता मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मादी चित्ता ‘दक्षा’ हिचा मृत्यू झाला आहे. इतर चित्यासोबत झालेल्या कडाक्याच्या झुंजीत तिचा मृत्यू झाला. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, मादी चित्ता दक्षा आणि धीरा नामक नर चित्ता फिंडा, वायु आणि अग्नि यांच्याशी लढाई झाली. यामध्ये दक्षाचा मृत्यू झाला.
यापूर्वी २३ एप्रिल रोजी कुनो नॅशनल पार्कमध्येच उदय नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. तर २७ मार्च रोजी किडनी विकाराने मादी चित्त्याचा मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये २० चित्ते आणण्यात आले होते, त्यापैकी १७ आता शिल्लक आहेत. सध्या ४ चित्त्यांना खुल्या जंगलात सोडण्यात आले आहे. चित्त्यांच्या या मृत्यूंच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र सरकारच्या उद्देशावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community