पुणे शहरातील रस्त्यांच्या कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; मंत्री Uday Samant यांची माहिती

39
पुणे शहरातील रस्त्यांच्या कामांचे 'थर्ड पार्टी ऑडिट'; मंत्री Uday Samant यांची माहिती
  • प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा तपासण्यासाठी प्रत्येक कामाचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ केले जाणार आहे. या ऑडिटनंतरच संबंधित कामांचे देयक दिले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. वारजे माळवाडी परिसरातील रस्त्यांच्या कामांबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार बापू पठारे यांनीही सहभाग घेतला.

(हेही वाचा – कर्नाटकात मुस्लिम आरक्षण मंजूर; Congress च्या तुष्टिकरणामुळे मुस्लिम ठेकेदारांना मिळणार निविदा प्रक्रियेत ४ टक्के आरक्षण)

मंत्री सामंत (Uday Samant) म्हणाले की, पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट ‘मेसर्स ईआयएल’ या कंपनीमार्फत केले जात आहे. पथ विभागाच्या पहिल्या टप्प्यात ८ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांपैकी ४ कामे पूर्ण झाली असून, ३ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३ कोटी ७० लाख रुपयांची कामे करण्यात येणार असून, त्यातील काहींना कार्यादेश देण्यात आले आहेत, तर काही निविदा प्रक्रियेत आहेत.

(हेही वाचा – Pune Mini Bus Fire case: बस मालकांनी पोलिसांना दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले…)

डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची तीन वर्षे आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांची पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असते. या कालावधीत निकृष्ट काम आढळल्यास त्याची दुरुस्ती कंत्राटदारांकडून करवून घेण्यात येईल, असेही मंत्री सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केले. राज्यात रस्त्यांच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने शासनाने थर्ड पार्टी ऑडिट अनिवार्य केल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे पुणे शहरातील रस्ते कामांची गुणवत्ता सुधारण्यास आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.