-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या सुरु असलेल्या कंत्राट कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आयआयटी मुंबईवर (IIT Mumbai) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रस्ते कंत्राट कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडीट करण्याच्या दृष्टीकोनातून आयआयटी मुंबईची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून या सल्लागार सेवेसाठी महापालिकेच्यावतीने तब्बल ३८ कोटी रुपये मोजले जाणार आहे.
(हेही वाचा – ‘पीओके’ हा भारताचा अविभाज्य भाग; United Nations मध्ये भारताने खडसावले)
मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरण करण्याकरिता पहिल्या टप्प्यामध्ये ३९८ कि. मी. व दुसऱ्या टप्प्यामध्ये ३०९ कि. मी. रस्त्यांच्या कामांचे आदेश दिले आहे. रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्याकरिता आयआयटी मुंबई (IIT Mumbai) सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. या कामांसाठी आयआयटी बॉम्बे यांची “तृतीय पक्ष सल्लागार” म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी या सल्लागार सेवेसाठी महापालिकेच्यावतीने आयआयटी मुंबईला ३८ कोटी रुपये मोजले जाणार आहे.
(हेही वाचा – Navi Mumbai Airport भूसंपादन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दणका)
या रस्त्यांच्या कामांमध्ये आयआयटी मुंबईसोबत सामजस्य करार करण्यात आला असून आयआयटी मुंबई (IIT Mumbai) रस्त्यांच्या पुर्नबांधणी तथा देखभालीकरिता योग्य पध्दत निवडण्याकरिता मार्गदर्शन करत आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच सर्व सदस्याकरिता कार्यशाळा बैठका आयोजित करेल आणि आवश्यकतेनुसार प्रकरणनिहाय मिक्स डिझाईन संबंधी गुणवत्ता हमी निकषानुसार तपासणी करतील. याशिवाय गुणवत्ता नियंत्रण तपासण्यांचे अहवाल तपासणे. तांत्रिक लेखापरिक्षा अहवाल तयार करणे आदी प्रकारची कामे या आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community