पावसाच्या माऱ्याने मुंबईतील ‘या’ भागात तापमान घसरले

पावसाच्या माऱ्याने मुंबईत शुक्रवारी, १६ सप्टेंबर रोजी दिवसभर संततधार सुरु राहिली. अधूनमधून ब्रेक घेत पावसाचा मारा सुरु असला तरीही मुंबईच्या कमाल तापमानात तीन अंशाने घट नोंदवली गेली. मुंबईत कुलाब्यात कमाल तापमान 27.4 अंश सेल्सीयस तर सांताक्रूझ येथे 27 अंश सेल्सीयस कमाल तापमान नोंदवले गेले. विद्याविहारमध्ये कमाल तापमान चक्क 25.8 अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरले. गेल्या पाच वर्षांतील मुंबईतील सप्टेंबर महिन्यातील हे सर्वात कमी तापमान आहे.

पावसाचा एकामागून एक नवा रेकॉर्ड

सप्टेंबर महिना हा पावसाळाच्या ऋतूमानातील शेवटचा महिना समजला जातो. सप्टेंबर महिन्यात पंधरवड्यानंतर पावसाचा जोरही जास्त नसतो. परंतु यंदा पावसाचा एकामागून एक नवा रेकॉर्ड सुरु आहे. दोन दिवसांच्या पावसाने मुंबईत चांगलीच कामगिरी केली. गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता. वांद्रे, चेंबूर, विक्रोळीमध्ये दुपारनंतर पाऊस थांबला. पश्चिम उपनगर परिसरात उत्तर मुंबईला पावसाने दिवसभरात झोडपले. कांदिवलीत शुक्रवारी सर्वात जास्त पाऊस झाला. कांदिवली अग्निशमन केंद्रात 93.2 मिमी पावसाची नोंद झाली. कांदिवली वर्कशॉप येथे 85.85 मिमी, बोरिवली येथे 81 मिमी पाऊस झाला.

(हेही वाचा हैदराबाद मुक्ती संग्राम : भाजपा आणि TRS येणार आमनेसामने)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here