भारतीयांना ‘या’ देशात व्हिसा फ्री एन्ट्री बंद! १ जानेवारी २०२३ पासून नवे नियम

185

अनेक देशांमध्ये भारतीया व्हिसा फ्री एन्ट्री देण्यात येते. परंतु स्थलांतराचे (Illegal Migration) प्रमाण कमी करण्यासाठी आणि युरोपीय व्हिसा पॉलिसीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्बियाच्या सरकारने भारतीयांसाठीचा फ्री व्हिसा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून नवा नियम लागू होऊन भारतीय पासपोर्टधारकांना वैध व्हिसाशिवाय सर्बियामध्ये जाण्याची मुभा नसेल.

( हेही वाचा : 7th Pay Commission : पीएमपी कर्मचाऱ्यांना नववर्षाचे गिफ्ट! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार)

१ जानेवारी २०२३ पासून नवे नियम 

यापूर्वी राजनैतिक आणि अधिकारीक भारतीय पासपोर्ट धारकांना ९० दिवस सर्बियामध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी होती. सामान्या भारतीय प्रवाशांसाठी हा कालावधी ३० दिवसांचा होता. परंतु आता भारतीयांना ३० दिवसांपर्यंत व्हिसामुक्त प्रवेशाची विद्यमान व्यवस्था १ जानेवारी २०२३ पासून मागे घेण्यात येत असल्याचे सरकारने निवदेनात स्पष्ट केले आहे.

सर्बियामध्ये एन्ट्रीसाठी व्हिसाची आवश्यकता

सर्बियाने सप्टेंबर २०१७ पासून भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश देण्यास सुरूवात केली होती. सर्बियाला जाणारे भारतीय नागरिक सर्बियाच्या शेजारील इतर युरोपीय देशांमध्ये प्रवास करू शकत नाहीत. सर्बियातील बेलग्रेड येथील भारतीय दूतावासाला सर्बियाने या नव्या बदलांविषयीची माहिती कळवली आहे. १ जानेवारी २०२३ पासून सर्बियामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व भारतीयांना सर्बियामध्ये एन्ट्रीसाठी व्हिसाची आवश्यकता असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.