मुंबईतल्या नव्या विषाणूच्या रुग्णाचा लंडनमधील रहिवाशाशी आला संपर्क

113

लंडनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू एक्सई आता मुंबईत पोहोचला आहे. या मुंबईतल्या एक्सई विषाणूच्या रुग्णाचा लंडनमधील दोन नागरिकांशी संपर्क आला होता. त्यामुळे संपर्कातून मुंबईतील ६७ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला एक्सईची बाधा झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. गेल्या महिन्यात या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली होती.

रुग्ण आपल्या पत्नीसह ११ मार्च रोजी मुंबईतून विमानाने गुजरात येथील वडोदरा येथे गेला होता. वडोदरा येथील अल्कापुरीतील हॉटेल वेलकम येथे दोघेही वास्तव्यास होते. याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या दोन ब्रिटीश नागरिकांशी त्यांची ओळख झाली. लंडनमधील स्थानिक महिला व पुरुष व्यवसायाच्यासंबंधी मुंबईतील रुग्ण व त्याच्या पत्नीला भेटले. दोन्ही लंडनस्थित नागरिक लंडनहून ६ मार्च रोजी भारतात आले होते.

( हेही वाचा : राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस! )

रुग्ण तातडीने मुंबईत परतला

११ मार्च रोजी रुग्ण व लंडनस्थित दोन्ही व्यावसायिकांची भेट झाली. त्याच दिवशी रुग्णाला ताप आला. दुस-या दिवशी रुग्णाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. रुग्णाने पत्नीसह तातडीने सांताक्रूझ येथील घरी टॅक्सीतून परतण्याचा निर्णय घेतला. दुस-या दिवशी दोघेही आपल्या घरी परतले. एक्सईची बाधा झालेल्या रुग्णाने कोरोनाप्रतिबंधात्मक दोन्ही लस घेतल्या आहेत. रुग्णाची पत्नी व घरकाम करणा-या महिलेला कोरोनाची लागण झाली नसल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.

लंडनस्थित महिला नागरिकाला कोरोना

मुंबईतील रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर १२ मार्च रोजी त्याच दिवशी लंडनस्थित दोन्ही व्यावसायिकांनी कोरोना तपासणी केली. त्यापैकी महिलेची कोरोना तपासणी पॉझिटीव्ह आली. दोघेही व्यावसायिक आठवड्याभरानंतर १८ मार्च रोजी लंडनला परतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.