Israel Hamas War : ही तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात; इस्रायली इतिहासकारांनी व्यक्त केली भीती

इस्रायल-गाझा युद्ध कदाचित मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष बनू शकेल. युक्रेनमधील युद्ध आणि सध्याच्या परिस्थितीमुळे भू-राजकीय तणाव अधिक देशांमध्ये पसरू शकतो, ज्यामुळे तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते, असे इस्रायली लेखक आणि इतिहासकार युवल नोह हरारी यांनी म्हटले आहे.

135
Israel Hamas War : ही तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात; इस्रायली इतिहासकारांनी व्यक्त केली भीती
Israel Hamas War : ही तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात; इस्रायली इतिहासकारांनी व्यक्त केली भीती

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. (Israel Hamas War) या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली संरक्षण दलाच्या म्हणण्यानुसार, १९५ लोक हमासच्या सैनिकांच्या कैदेत आहेत. यापूर्वी हा आकडा 120 असल्याचे सांगण्यात आले होते. युद्धादरम्यान, इस्रायली लेखक आणि इतिहासकार युवल नोह हरारी म्हणाले की, इस्रायल-गाझा युद्ध कदाचित मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष बनू शकेल. युक्रेनमधील युद्ध आणि सध्याच्या परिस्थितीमुळे भू-राजकीय तणाव अधिक देशांमध्ये पसरू शकतो, ज्यामुळे तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते. (Israel Hamas War)

(हेही वाचा – LinkedIn Job Cuts : लिंक्ड-इन कंपनीतून आणखी ७०० जणांची कर्मचारी कपात )

एका विशेष मुलाखतीत, इस्रायली बेस्टसेलर लेखक युवल नोह हरारी म्हणाले, ”कोविड-19 महामारी, युक्रेनमधील युद्ध आणि आता इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्धानंतर जागतिक अस्थिरता वाढली आहे. इस्रायल-हमास युद्धात आणखी देश अडकण्याचा धोका आहे. यामुळे शेवटी अशी परिस्थिती उद्भवू शकते की, ज्यामुळे जागतिक युद्ध होऊ शकते.”

नोहा हरारी पुढे म्हणतात, “सामान्यत: अशा परिस्थितीत व्यवस्था नष्ट होत आहे. अराजकता त्याची जागा घेत आहे. गेल्या 5 ते 10 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. आज आपण ते अधिक देशांमध्ये पाहू शकतो; याचे कारण देखील कोविड होते. युक्रेनवरील रशियन हल्ला हा देखील त्याचाच एक भाग आहे.”

नोहा हरारी म्हणाले, “इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या जे घडत आहे, त्याचा हा एक भाग आहे. जर आपण व्यवस्थेची पुनर्रचना करू शकलो नाही, तर ती आणखी वाईट होईल. तो जगभर पसरेल. यामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते. शस्त्रांचा वापर आणि आता अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानामुळे मानवजातीचा नाश होऊ शकतो.”

नोहा हरारी हे प्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वज्ञ आणि अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांचे ‘सेपियन्स: अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड’ हे पुस्तक बेस्टसेलर ठरले आहे. (Israel Hamas War)

दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दक्षिण गाझामधील रफाह क्रॉसिंगवर युद्धविरामावर सहमती झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. सध्या गाझा रिकामा करण्यासाठी रफाह क्रॉसिंग हा एकमेव मार्ग आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात गाझामध्ये आतापर्यंत 2450 पॅलेस्टिनी इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मरण पावले आहेत. यामध्ये 724 हून अधिक मुले आणि 370 हून अधिक महिलांचा समावेश आहे. त्याचवेळी हमासच्या हल्ल्यात सुमारे 1400 इस्रायली मारले गेले आहेत. (Israel Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.