गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ-वर्धा पॅसेंजर पुन्हा धावू लागणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅसेंजरने विदर्भातील लोक शेगाव येथे जाण्यासाठी मोठ्या संख्येत ये-जा करत असतात. दुपारी २.२० नंतर शेगाव येथून अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा (अमरावती), चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, पुलगाव आणि वर्धा येथे येण्यासाठी रेल्वेच नाही. यामुळे शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होत होती परंतु, आता १५ नोव्हेंबरपासून भुसावळ-वर्धा पॅसेंजर सुरू होत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ही गाडी प्रत्येक स्थानकांवर थांबते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी ती किफायती व सोयीस्कर असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली.
( हेही वाचा : दिवस ठरवा आपण चर्चा करू; रिफायनरी विरोधकांना निलेश राणेंचे आश्वासन)
पॅसेंजर ट्रेन सुरू होणार
पॅसेंजर गाडी क्र. १११२१ ही दु. २ वाजता भुसावळ स्थानकावरून सुटेल आणि रात्री ९ वाजता वर्धा स्थानकावर पोहोचेल. दु. ४.३० वाजता शेगाव स्थानकावर, सायं. ५.३० वाजता अकोला स्थानकावर, सायं. ७ वाजता बडनेरा स्थानकावर थांबा घेईल. त्याचप्रमाणे पॅसेंजर गाडी क्र. १११२२ वर्धा-भुसावळ ही १६ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०५ वाजता वर्धा स्थानकावरून सुटेल आणि स. ९.१५ पर्यंत भुसावळ स्थानकावर पोहोचेल.
एक्सप्रेसमधील गर्दी कमी होणार
सध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. ते बघता पुन्हा पॅसेंजर सुरू झाल्यानंतर आपोआपच एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी कमी होणार आहे. लहान स्थानकांवरही ही पॅसेंजर थांबत असल्यामुळे प्रवाशांना तिकीटासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही.
Join Our WhatsApp Community