आपण अनेकदा एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहिलं आहे. असं काहीस पुन्हा एकदा घडलं आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी एसी लोकल थांबवल्याची घटना बुधवारी, २४ मे रोजी घडली आहे. गाडीमधला एसी कार्यरत नसल्यामुळे प्रवाशांनी लोकल थांबवली होती. वांद्रे स्थानकात ५ ते ६ मिनिटं हा सगळा गोंधळ सुरू होता.
माहितीनुसार, सकाळी ७.५६ मिनिटांची विरारहून चर्चेगेटला एसी लोकल रवाना झाली होती. पण गाडीतला एसी कार्यरत नसल्यामुळे प्रवाशांनी बांद्रा स्थानकात लोकलचे दारच बंद होऊ दिले नाही. जवळपास ५ ते ६ मिनिट हा गोंधळ सुरू होता. प्रवाशांच्या या गोंधळानंतर गाडीतला एसी सुरू झाला आणि त्यानंतर ही एसी लोकल रवाना करण्यात आली आहे.
#Westernrailway kindly look into issues with AC local trains. The morning train from virar to churchgate 7:56 has persistent issues with improper cooling…passengers are facing issues everyday. Even automatic speaker devices are also not working inside the train.
— Vipul Duse (@VipulDuse) May 24, 2023
यापूर्वीही एसी लोकलमधला एसी व्यवस्थित कार्यरत नसल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. गाडीतला एसी व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असतो. बुधवार याच त्रासाला कंटाळून चक्क प्रवाशांनी लोकल चालूच दिली नसल्याचा प्रत्यय पाहायला मिळाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community