डिसेंबरमध्ये उरका ‘ही’ महत्वाची कामे; अन्यथा भरावा लागणार आर्थिक दंड

129

डिसेंबर महिना लवकरच सुरु होणार आहे. नववर्ष निश्चितपणे साजरे करण्यासाठी 2022 मधील करांशी संबंधित 4 कामे डिंसेबरमध्ये उरकून घ्यायला हवीत. विलंब शुल्कासह आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणे, भरलेल्या आयटीआरमधील चुका दुरुस्त करणे, जीएसटी विवरणपत्र-9 सी दाखल करणे आणि अग्रीम कराचा तिसरा हप्ता भरणे यांचा त्यामध्ये समावेश आहे.

कर सल्लागारांच्या मते, या चारपैकी एखादे काम जरी राहिले, तरी तुम्हाला दंड व अतिरिक्त व्याज द्यावे लागू शकते. शिवाय कायदेशीर नोटीसला उत्तरही देत बसावे लागेल ते वेगळेच. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे उरकायला हवीत.

या गोष्टींकडे ठेवा लक्ष

  • विलंब शुल्काला आयटीआर

2021-22 चे आयटीआर अजून भरलेले नाही. ते 31 डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह भरु शकतात. 5 लाखांच्या आत उत्पन्न असल्यास 1 हजार रुपये, तर 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 5 हजार रुपये विलंब शुल्क त्यासाठी लागेल.

  • अग्रिम कराचा तिसरा हप्ता

2022-23 चा अग्रिम कर भरण्याची अंतिम तारिख 15 डिसेंबर आहे. 10 हजारांपेक्षा अधिक आयकर लागणा-यांना 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के कर आगाऊ भरावा लागतो. अन्यथा 1 टक्का व्याज लागते.

  • ITR मध्ये सुधारणा:

2021-22 च्या आयटीआरमधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत सुधारित आयटीआर दाखल करता येते. त्यानंतर चुका सुधारण्याची संधी मिळणार नाही.

GSTR: 9C – GSTR- 9 मध्ये काही सुधारणा करायची असल्यास जीएसटीआर-9 सी दाखल करता येते. 2021-22 चे जीएसटीआर-9 सी 31 डिसेंबरपर्यंत दाखल करता येईल. त्यानंतर दररोज 200 रुपये विलंब शुल्क लागेल.

गॅस होऊ शकतो स्वस्त

डिसेंबरमध्ये जनसामान्यांना दिलासा देणारे काही बदल होऊ शकतात. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत यापूर्वी कपात करण्यात आली आहे. यावेळी डिंसेबरच्या सुरुवातीलाच स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

हयात प्रमाणपत्र लवकर द्या

निवृत्तीवेतनधारकांना हयात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2022 ही अंतिम तारीख आहे. हयात प्रमाणपत्र न दिल्यास डिसेंबरमध्ये मिळणारी पेन्शन थांबू शकते.

( हेही वाचा: आफताब तर निघाला तालिबानी जिहादी… )

OTP शिवाय ATM पैसे देणार नाही

डिसेंबरमध्ये एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्याचा उपयोग करुनच पैसे काढता येतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.