यंदा बाप्पांची संख्या २० हजाराने वाढली!

आतापर्यंत मागील दहा दिवसांमध्ये एकूण १ लाख ५७ हजार ३२३ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले.

मागील वर्षी कोरोना विषाणूच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काही प्रमाणात अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन होऊ शकले नव्हते. परंतु यंदा या रोगाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी असल्याने तसेच लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने यंदा बाप्पांचे आगमन अनेकांच्या घरात झाले. मागील वर्षी जिथे १ लाख ३१ हजार ३७३ गणरायांचे आगमन झाले होते, तिथे या वर्षी १ लाख ५० हजार गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन पार पडले. त्यामुळे यंदा आगमन झालेल्या बाप्पांची संख्या २० हजारने वाढल्याचे पाहायला दिसून येते.

१ लाख ५७ हजार ३२३ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले!

मुंबईत दहा दिवसांच्या एकूण ३४ हजार ४५२ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये २९ हजार ६० घरगुती आणि ५,०४३ सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश आहे. तर आतापर्यंत मागील दहा दिवसांमध्ये एकूण १ लाख ५७ हजार ३२३ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये १ लाख ४२ हजार ५०३ घरगुती आणि ७ हजार ८८७ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. तर मागील गणेशोत्सवात एकूण १ लाख ३५ हजार ५१५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यामध्ये १ लाख २४ हजार ९३० घरगुती आणि ६ हजार ४४५ सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश होता.

(हेही वाचा : आयुक्त नक्की कुणाचे?)

कृत्रिम तलावांमधील विसर्जनात वाढ

मागील वर्षी ६३ कृत्रिम तलावांमध्ये एकूण ७० हजार घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. तर यावर्षी एकूण ७३ कृत्रिम तलावांमध्ये ७८ हजार ८२६ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत साठे आठ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here