Ganeshotsav 2023 Immersion : मुंबईत यंदा किती वाढले घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती, काय सांगते आकडेवारी जाणून घ्या

126
Ganeshotsav 2023 Immersion : मुंबईत यंदा किती वाढले घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती, काय सांगते आकडेवारी जाणून घ्या
Ganeshotsav 2023 Immersion : मुंबईत यंदा किती वाढले घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती, काय सांगते आकडेवारी जाणून घ्या

श्री गणरायांचे आगमन झाल्यांनतर दहा दिवस बाप्पांची पुजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दर्शीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. घरोघरी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळांच्यावतीने प्रतिष्ठापना केलेल्या बहुतांशी गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडल्याने यंदा घरगुती बाप्पांच्या संख्येत तब्बल दहा हजारने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर सार्वजनिक गणेश मूर्तींच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत ५३४ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता काही महत्वाची मंडळे दुसऱ्या दिवशी विसर्जन करत असतात. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या संख्येत काही किरकोळ वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

श्री गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी करण्यात आले असून मागील दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीच्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या विसर्जनात यंदा एकूण १ लाख ८६ हजार ८०२ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. तर अनंत चतुर्दशीच्या एकाच दिवशी एकूण ३२ हजार ३४५ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. तर दिवसभरात ६ हजार ९५१ सार्वजनिक आणि ४६२ गौरी व हलतारिकांचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे मागील दहा दिवसांमध्ये एकूण १० हजार ५०१ सार्वजनिक आणि ८ हजार ४१९ गौरींचे विसर्जन पार पडले.

(हेही वाचा – Muslim : यवतमाळमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुसलमानांनी केली ‘ही’ धर्मांध कृती)

यंदाच्या म्हणजे सन २०२३च्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना झालेल्या घरगुती गणपतीपैंकी दहा दिवसांमध्ये एकूण १ लाख ८६ हजार ८०२ मूर्तींचे विसर्जन पार पडले. तर मागील वर्षी म्हणजे सन २०२२च्या गणेशोत्सवामध्ये १ लाख ७६ हजार ३०० गणेश मूर्ती आणि सन २०२१च्या गणेशोत्सवामध्ये १ लाख ५० हजार २०२ मूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दहा हजारने अधिक गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे.

तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींमध्येही यंदा ५३४ मूर्तींने अधिक वाढ झाल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मागील दहा दिवसांमध्ये एकूण १० हजार ५०१ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचे विसर्जन आकडेवारींवरून दिसून येत आहे. मागील म्हणजे सन २०२२च्या गणेशोत्सवामध्ये एकूण ९ हजार ९६७ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते, तर सन २०२१च्या गणेशोत्सवामध्ये ८ हजार २७ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्सवामध्ये ५३४ मंडळांच्या गणेश मूर्तींची भर पडल्याचे दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.