बेस्टच्या त्या अतिरिक्त चालकांची संप काळात झाली आठवण: खासगी बसेसचे स्टेअरींग पुन्हा त्यांच्या हाती

1478
बेस्टच्या त्या अतिरिक्त चालकांची संप काळात झाली आठवण: खासगी बसेसचे स्टेअरींग पुन्हा त्यांच्या हाती

बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या संपात फुट पडू लागली असून शुक्रवारी (४ ऑगस्ट) २० आगारांमधील कामगारांनी कामबंद आंदोलन केले होते, तिथे शनिवारी १८ आगारांमधील कामगार संपात सहभागी झाले होते. त्यामुळे बेस्टमधील जे अतिरिक्त चालक इतर विभागांमध्ये कार्यरत होते, त्यांच्या हाती आता वेट लिजवरील बसेसचे स्टेअरींग देत त्यांच्या माध्यमातून बेस्टची सेवा अडवणूक करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनानंतरही सुरळीत राखण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला जात आहे. बेस्ट उपक्रमाचे स्वतःचे जे अतिरिक्त बस चालक दुसऱ्या विभागात काम करत होते , त्यांना परत बोलावून वेट लिजवरील गाड्या रस्त्यावर आणण्यात आल्या. दिवसभरात अशा बस चालकांचा वापर करून ४८८ बस गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या,असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.

शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी खाजगी बस पुरवठा कंत्राटदाराच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे १३७५ बस गाड्या रस्त्यावर आल्या नव्हत्या, तर शनिवारी सलग चौथ्या दिवशी १८ आगारांमधील एकूण १०७७ बसेस रस्त्यावर धावू शकल्या नाहीत असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी दोन आगारांमधून सुमारे १९८ बसेस रस्त्यावर आल्याने कामगारांच्या आंदोलनात मोठी फुट पडत असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – शरद पवारांच्या मनात काय?;’इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद दिले ठाकरे गटाला)

१८ आगारांमध्ये आंदोलनाचा फटका

काम बंद आंदोलना मुळे बॅकबे, कुलाबा, वरळी,आणिक, प्रतिक्षा नगर, धारावी, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड,मरोळ, मजास,दिंडोशी, शिवाजी नगर, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अश्या एकूण १८ आगारांच्या बस गाड्यांच्या फेऱ्यांवर फरक पडला.

४१६ खासगी बसेस सेवा कायम

शनिवारी झालेल्या आंदोलनात एसएमटी, मातेश्वरी, टाटा, हंसा, आणि स्विच या संस्थेच्या कामगारांचा समावेश आहे. असे असले तरी एसएमटीच्या २८० बसेस, मातेश्वरीच्या ९०, हंसाच्या ४० आणि स्वीचच्या ६ बसेसची सेवा सुरु होती. या खासगी कंपनींविरोधात कंत्राटातील अटी व शर्ती प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी ४ वाजे पर्यंत एसटी महामंडळाच्या १०४ गाड्यांची सेवा बेस्टच्या बस मार्गावर सुरु करण्यात आली होती. या काम बंद आंदोलनाबाबत सर्व बस पुरवठादार व्यवसाय संस्था मालक आणि महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान महाव्यवस्थापकांनी बेस्ट उपक्रमाच्या होणाऱ्या असुविधेबाबत कल्पना दिली. तसेच त्यांना या काम बंद आंदोलनाबाबत त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.