Social Media : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी

सातारा पोलिसांनी आरोपी तरुणाला केली अटक

144
Social Media : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी
Social Media : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी

साताऱ्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर Social Media आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट केलं होतं. त्यावर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रास्ता रोको करत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी आंदोलकांना आरोपीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. परंतु जोपर्यंत आरोपीला अटक नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर शहरातील तणाव निवळला.

(हेही वाचा : Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ)

सातारा पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत आरोपीवर कठोर कारवाईच्या सूचना केल्या आहे. त्यानंतर वाद निवळला. त्यानंतर आता सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट, अफवा, आणि खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.