नेपाळमध्ये आता पुन्हा राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी हजारो लोक राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर उतरले होते. नेपाळमध्ये राजेशाहीची पुन्हा एकदा मुहुर्तमेढ व्हावी, अशी लोकांची मागणी आहे. नेपाळचे माजी शासक राजे ज्ञानेंद्र शाह हे पुन्हा एकदा काठमांडूमध्ये परतले असून हजारो लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी काठमांडूच्या रस्त्यावर एकच गर्दी केली. यामुळे नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) होणार का? अशी शक्यता वर्तविली जात आहे.
रविवारी काठमांडूच्या रस्त्यांवर ज्ञानेंद्र शाह यांचे स्वागत करण्यासाठी उसळलेल्या गर्दीची एकच मागणी होती. ती म्हणजे राजेशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी. राजधर्माबरोबरच हिंदू राष्ट्राचीही (Hindu Rashtra) पुनर्स्थापना केली जावी, अशीही मागणी केली जात आहे. राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी काठमांडू शहरात जवळपास १० हजार लोक आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक जमले होते. तर राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थकांनुसार हा आकडा ४ लाख असू शकतो, असे सांगितले जाते. यावेळी राजेशाहीचा समर्थक पक्ष राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचेही अनेक नेते आणि कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. ज्ञानेंद्र शाह मागच्या दोन महिन्यापासून राजधानी काठमांडूपासून दूर होते. आता काही काळापर्यंत राजेशाहीचे कट्टर विरोधक असलेल्यांचाही विरोध आता हळूहळू मावळू लागला असून ज्ञानेंद्र शाह यांच्या हातात देशाची कमान द्यायला हवी, असे त्यांचे मत होत आहे. (Hindu Rashtra)
Join Our WhatsApp Community