खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने भारतीय विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. शीख दंगलींना ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, अशी धमकी पन्नूने दिली आहे. त्याने १ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नका, असा सल्लाही गुरपतवंतसिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने दिला आहे. (Bomb Threats in Flights)
(हेही वाचा – Delhi CRPF School Blast प्रकरणाची खलिस्तान्यांनी घेतली जबाबदारी; स्क्रीनशॉट व्हायरल! गृह मंत्रालयाने अहवाल मागवला)
गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक विमान कंपन्यांना विमान बॉम्बने उडवून देण्याच्या १०० हून अधिक धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळ आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुरपतवंतसिंग पन्नूने सिख फॉर जस्टीस नावाची संघटना स्थापन केली आहे. ही संघटना सातत्याने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे अन्वेषण यंत्रणांनी उघडकीस आणले.
गेल्या आठवड्यात पन्नूने भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांना प्रत्युत्तर म्हणून पन्नूने हा व्हिडीओ जारी केला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ओटावा येथे झालेल्या एका जनसुनावणीला संबोधित करताना मॉरिसन म्हणाले, “कॅनडाचे धोरण अगदी स्पष्ट आहे, भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.” मॉरिसन यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून गुरपतवंत सिंगने नवा व्हिडीओ जारी केला आहे. त्यातून पन्नूने जम्मू आणि काश्मीरसह आसाम, मणिपूर व नागालँडसारख्या देशाच्या विविध भागांत फुटीरतावादी चळवळींना प्रोत्साहन देण्याची धमकी दिली आहे. (Bomb Threats in Flights)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community