मावळ परिसरात एकाच दिवसात तीन अपघात; एकाचा मृत्यू

89

जुना मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव फाट्यापासून ते सोमाटणे फाट्यापर्यंत होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मंगळवार, 11 एप्रिल रोजी एकाच दिवशी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर तीन अपघात झाले.पहिला अपघात पहाटे विजय मारुती खिंड इथे, दुसरा सकाळी लिंब फाट्यावर आणि तिसरा दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलिस चौकीसमोरच झाला.

मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात एका ऑटोरिक्षाची कंटेनरला धडक बसली. यात रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑटो रिक्षा क्रमांक (एम.एच.14 जे.पी.6558) हिने कंटेनर (क्रमांक एम.एच. 12 एफ.झेड. 4201) याला धडक दिली. यात रिक्षातील एकजण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पवना हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे शहरातून उर्से गावाकडे जाणाऱ्या मार्गावर खिंडीमध्ये एका दुचाकी स्वाराचा मंगळवारी सकाळी अपघात झाला. दुचाकीवरून (एमएच 14/एफवाय 0119) तळेगाव दाभाडे ते उर्से यादरम्यानच्या मार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.

(हेही वाचा मोदींची पदवी मागणाऱ्या ‘आप’चे दोन डझनहून अधिक आमदार विनापदवीधर!)

महामार्गावर लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे एमएसआरडीसीकडून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरी देखील या चौकात दोन कारची मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास धडक झाली. लिंब फाटा येथे वडगावच्या दिशेने सोमाटणेकडे दोन डंपर जात होते. लिंब फाटा येथे डंपरच्या समोरून सोमाटणे बाजूकडून तळेगावात जात असलेल्या एका कार चालकाने कार घालण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी वडगावकडून सोमाटणेकडे निघालेल्या एका कारची रस्ता ओलांडणाऱ्या कारला धडक बसली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.