आता केंद्रीय शिक्षण बोर्डाचा घोटाळा; ३ शाळा अनधिकृत

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.  बनावट ना हरकत पत्र देऊन तीन केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांवर लवकरच कारवाही होणार आहे. शिक्षण विभागाने या शाळांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. याच प्रमाणे अजूनही जिल्ह्यात काही शाळा आहेत ज्या बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत.

कुठल्या आहेत अनधिकृत शाळा?
  • एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बीएमसीसी रोड, शिवाजीनगर
  • नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज
  • क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज

(हेही वाचा ‘वक्फ बोर्डा’ची लपवाछपवी; कारभार संकेतस्थळावर उघड करण्याची मागणी)

या तिन्ही सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, १२ लाखात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून ही एनओसी दिली जाते. पण ही टोळी चक्क बारा लाखात सीबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here