Mumbai Local: खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे घसरले

खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या रेल्वे अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेमुळे नेरुळ, बेलापूरकडून खारकोपरला जाणारी आणि खारकोपरवरून नेरुळ, बेलापूरकडे जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच याचा मुख्य मार्गावर म्हणजे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या घटनेबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८.४६ वाजता बेलापूर ते खारकोपरला धावणाऱ्या लोकलचे तीन डब्बे खारकोपर स्थानकाजवळ रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशांना इजा झालेली नाही. तसेच सध्या ही घसरलेली लोकल पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत.

या घटनेचा परिणाम बेलापूर- खारकोपर- नेरुळ मार्गावरील रेल्वे गाड्यांवर झाला आहे. या मार्गावरील लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच हार्बर मार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत.

(हेही वाचा – १ मार्चला कोथरुड, डेक्कनसह पुण्यातील ‘या’ भागातील पाणी पुरवठा बंद!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here