मुंबईकरांना थोडासा विरंगुळा मिळावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दिनांक ३१ जानेवारी ते दिनांक २ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. यंदाचा हा २८ वा पुष्पोत्सव आहे. विविध प्रजातीची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगबेरंगी फुलझाडे, औषधी वनस्पती इत्यादी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा या पुष्पोत्सवात समावेश असेल. (Rani Baug)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (उद्याने) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (Rani Baug)
आतापर्यंत पार पडलेल्या पुष्पोत्सवांना जपान, मलेशिया, कॅनडा, मॉरिशस या देशांच्या राजदूतांसोबतच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश मंजुषा देशपांडे, अभिनेता रणजित, पवन मल्होत्रा, एकता जैन, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यासारख्या दिग्गजांनी भेट दिली आहे. (Rani Baug)
फुलझाडे आणि फळझाडांच्या प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तुंची विक्री, झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने याठिकाणीही नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी खुली करण्यात येणार आहेत. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (Rani Baug)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community