मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway Traffic Block) तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असणार आहे. त्यामुळे वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे महामार्गावर पुलाचे गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. बांधकाम सुरळीतपणे पूर्ण व्हावे यासाठी महामंडळाने २२, २३ आणि २४ जानेवारी असे तीन दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत ट्रॉफिक ब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग म्हणजे मुंबई-पुणे (Mumbai Pune) द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे पुलाचे गर्डर्स बसवले जाणार आहेत. या कामासाठी तीन दिवसांचा ट्रॉफिक ब्लॉक असल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने (Mumbai Pune Alternative route) वळवण्यात येणार आहे.
(हेही वाचा – लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? भाजपाचे मंत्री Radhakrishna Vikhe-Patil म्हणाले…)
मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही महामार्गाच्या किमी क्र. 4/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल. तिन्हीही दिवशी दुपारी ३ नंतर मुंबईकडून पुण्याला जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गावरुन सुरू राहील.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community