चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील अनुक्रमे १३, १४ आणि १५ वयाच्या तीन अल्पवयीन मुली या वैनगंगा नदीच्या पात्रात नावेत बसून एका काठावरून दुसऱ्या काठावर जात असताना अचानक नाव बुडाली. यात या तिन्ही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
आंबे तोडण्यासाठी जात होत्या!
या तिन्ही मुली नावेत बसून एका काठावरून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्यासाठी जात होत्या. जेव्हा त्यांची नाव नदीमध्ये खोल गर्त्याजवळ आली, तेव्हा नावेचा तोल सुटला आणि या तिन्ही मुली नावेतून बाहेर पाण्यात पडल्या. या तिन्ही मुलींपैकी कुणालाही पोहता येत नव्हते, त्यामुळे या तिन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील राहणाऱ्या या 3 मुली होत्या.
(हेही वाचा : धक्कादायक! भिवंडीतून १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त )
पोहता येत नसल्याने मृत्यू!
मृत झालेल्या मुलींची नावे सोनी मूकरू शेंडे, समृद्धी ढिवरु शेंडे आणि पल्लवी रमेश भोयर अशी आहेत. या तीन मुलींपैकी सोनी मूकरू शेंडे ही विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थीनी असून ती यावर्षी आठव्या वर्गात होती. या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात चामोर्शी येथे दिली असता तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृत्यू मुलींचे मृतदेह बाहेर काढून ते सामान्य रुग्णालयात चामोर्शी येथे शवविच्छेदनासाठी पाठवले.
Join Our WhatsApp Community