दिवाळीसण आठवडाभरावर आलेला असताना राज्यात कोरोनाच्या तीन विषाणूचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यात एक्सबीबी हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी करतो आहे. देशभरातून केवळ महाराष्ट्रात बीए 2.3.20 आणि बीक्यू.1 हे नवे व्हेरीएंट आढळून आले आहेत. रायगड, मुंबई, ठाण्यात कोरोना रुग्ण आता वाढू लागले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
( हेही वाचा : हिंदु जनजागृती समितीचे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियान! मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट आदी दुकानांच्या बाहेर आंदोलन )
राज्यात अचानक रुग्णसंख्येत दबक्या पावलाने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी कोरोनाच्या नव्या विषाणूची माहिती देण्यात दिली. राज्यात आठवड्याभरात 17.7 टक्क्यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आली आहे. जनूकीय क्रमनिर्धारण तपासणीत 2.75 या व्हेरीएंटमध्ये केवळ घट दिसून आली आहे. या व्हेरिएंटचे प्रमाण 95 टक्क्यांवरून घसरून 65% नोंदवले गेले आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
- फ्ल्यू सारखा कोणताही आजार अंगावर काढू नका तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्यानुसार उपचार करा.
- गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोविड अनुरूप वर्तन अंगीकारणे.
- केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे कोविड लस घेणे.
- अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना अधिक काळजी घेणे. तसेच, ज्यांना सर्दी खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे.