छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी जगरगुंडा नजीकच्या आश्रम पारा परिसरात जोरदार चकमक उडाली. यात डिस्टिक रिझर्व्ह ग्रुपचे (डीआरजी) तीन जवान हुतात्मा झाले.
या परिसरात सुरक्षा दलांनी सर्चिंग ऑपरेशन हाती घेतले होते. यावेळी परिसरात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यात एएसआय रामूराम नाग, कुंजम जोगा आणि वंजम भीमा हे जवान हुतात्मा झाले. तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगरगुंडा परिसरात नव्याने स्थापन झालेल्या कुंदेड कॅम्पच्या क्षेत्रात सुरक्षा दल शोध मोहिम राबवित असताना आश्रमपारा परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सकाळी ८ वाजता हल्ला चढवला. ही चकमक सकाळी ९.३० वाजेपर्यंत सुरू होती. यात तीन जवान हुतात्मा झालेत. दरम्यान सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले की, ‘या परिसरात अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली असून नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.’
(हेही वाचा – महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा हल्ला; दोन पोलीस हुतात्मा, एक जखमी)
Join Our WhatsApp Community