Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीसाठी बांधणार तीन भुयारे आणि उड्डाणपूल

प्रकल्पांतंर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुधीर फडके फ्लायओवर, पार्ले हनुमान रोड जंक्शन, मिलन सब वे जंक्शन तसचे पूर्व उपनगरांतील बीकेसी कनेक्शन आदी चार ठिकाणची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

2350
Eastern Expressway वरील पूल आणि उड्डाणपुलांच्या डागडुजीची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर

एमएमआरडीएकडून महापालिकेने ताब्यात घेतलेल्या पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवून मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी प्रवेश नियंत्रण प्रकल्प अर्थात एक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट हाती घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतंर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुधीर फडके फ्लायओवर, पार्ले हनुमान रोड जंक्शन, मिलन सब वे जंक्शन तसचे पूर्व उपनगरांतील बीकेसी कनेक्शन आदी चार ठिकाणची कामे हाती घेण्यात येणार आहेत. (Eastern and Western Expressway Bridges)

पश्चिम आणि पुर्व द्रुतगती महामार्ग हे नोव्हेंबर २०२२ पासून एमएमआरडीएकडून महापालिकेला हस्तांतरीत झाले. एमएमआरडीएकडून एक्सेस कंट्रोलच्या बाबतीत लुईस बर्गर कंपनीकडून विविध आराखडे तयार केले होते. परंतु या प्रस्तावांमध्ये जुने पुल तोडून मोठ्या लांबीचे पूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासाठी सुमारे दहा हजार कोटींची गरज होती. तसेच यामध्ये पुलाखालून अंडरपास मार्ग काढला जावा, असा आराखडा बनवला होता. परंतु त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्याकडे झालेल्या बैठकीत यासाठी होणारा खर्च, कालावधी आणि अडचणी लक्षात घेता प्रथम पुलाखालील जंक्शन बांधण्याचा सर्वोत्तम प्राधान्य देण्याचे सुचवले होते. (Eastern and Western Expressway Bridges)

सुरुवातीला दहा जंक्शनचे आराखडे सादर केले गेले. त्यानंतर सल्लागाराने यासाठी असमर्थता दर्शवल्याने या कामासाठी वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी टीयुएसपीएल या सल्लागाराची नेमणूक केली. त्यामध्ये ९ जंक्शन पैंकी ५ प्रकरणानंतर भूसंपादन करणे आवश्यक असल्याने उर्वरीत ४ चे काम काम हाती घेण्याचे निश्चित केले. या कामांसाठी विविध करांसह ११२५ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Eastern and Western Expressway Bridges)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule: राहुल गांधी जसं जसं मुंबईकडे येतील, तसं तसं महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते पक्ष सोडतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा)

बी. के. सी कनेक्टरचा विस्तार :

सध्या बी. के. सी कनेक्टर वरून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. स‌द्याच्या वाहतूकीला सायन येथून कुर्ला उड्डाणपुलापर्यंत जावे लगते. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. (Eastern and Western Expressway Bridges)

कोणते होणार बांधकाम : ही वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता बी. के. सी कनेक्टर दक्षिण मुंबईच्या दिशेने इंग्रजी अक्षर ‘यु’ आकाराचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. (Eastern and Western Expressway Bridges)

सुधीर फडके उड्डाणपूल :

सध्या सुधीर फडके उड्डाणपुलावरून वाहतूक होणाऱ्या वाहनांना थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नाही. त्यामुळे या उड्डाणपुलावरुन येणाऱ्या वाहतुकीस मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दहिसरच्या दिशेने उलट प्रवास ओवरी पाडा उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो. जेणेकरून नॅशनल पार्क आणि ओवरी पाडा मेट्रो स्टेशन जंक्शन येथे वाहतूक कोंडी होते.

कोणते होणार बांधकाम : याठिकाणी ठिकाणी वाहनासाठी भुयारीमार्ग बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीला थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल. (Eastern and Western Expressway Bridges)

पार्ले हनुमान रोड जंक्शन :

सध्य स्थितीत, पार्ले हनुमान रोड जंक्शनला येणाऱ्या वाहतुकीस पश्चिम द्रुतगती मार्गावर थेट प्रवेश नाही. कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुल आणि पार्ले पुर्वेकडील वाहतूक विमान जंक्शनकडे वळवली जाते. ज्यामुळे वाहतूक कोडी निर्माण होऊन विमानतळ जंक्शनवर त्याचा विपरीत परिणाम होतो. (Eastern and Western Expressway Bridges)

असे होणार बांधकाम : याठिकाणी वाहनांसाठी भुयारीमार्ग बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतुकीला थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल.

मिलन सब वे जंक्शन :

सध्य स्थितीत, मिलन सबवे जंक्शनला येणाऱ्या वाहतुकीस पश्चिम द्रुतगती मार्गावर थेट प्रवेश नाही. येथे वाकोला जंक्शन वरुन येणाऱ्या व विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडी निर्माण होते, व त्यामुळे सांताक्रुझ पूर्व भागातील वाहतुकीवर व परिणामी पश्चिम दुतगती मार्गावरील वाहतुकीवर विपरीत परिणाम होतो.

असे होणार बांधकाम : याठिकाणी वाहनांसाठी भुयारीमार्ग बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतुकीला थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल. (Eastern and Western Expressway Bridges)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.