अंधेरी पश्चिम – मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर पुढे इच्छित स्थळी जाणे सोपे व्हावे यासाठी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्प (मल्टि मॉडल इंटिग्रेशन प्लॅन) राबविण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.या मार्गिकेच्या संचलनासाठी आवश्यक असलेल्या गाड्यांपैकी तीन मेट्रो गाड्या नुकत्याच मुंबईत दाखल झाल्या आहेत. (Metro 2B Route)
अंधेरी पश्चिम – मानखुर्द मेट्रो २ ब’ या गाड्या मंडाळे येथील डबलडेकर कारशेडमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची लवकरच जोडणी करून चाचणी घेण्यात येण्याची शक्यता आहे. दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘मेट्रो २ ब’अंतर्गत अंधेरी पश्चिम – मंडाळे असा करण्यात येत आहे. २३.६४ किमी लांबीच्या या मेट्रो मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या मार्गिकेतील ३१ हेक्टर जागेवरील कारशेडच्या कामानेही गती घेतली आहे. या कारशेडमध्ये एका वेळेला ७२ गाड्या उभ्या करता येणार आहेत. या कारशेडचे अंदाजे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता या कारशेडमध्ये लाल आणि निळ्या रंगाच्या तीन मेट्रो गाड्या दाखल झाल्या आहेत. बंगळुरू येथील भारत अर्थ मूवर्स लिमिटेड कंपनी ‘मेट्रो २ ब’च्या गाड्यांची बांधणी करीत आहे. ( Metro 2B Route )
(हेही वाचा : Diwali 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान यंदाही हिमाचल प्रदेशात)
मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर धावणाऱ्या गाड्यांची बांधणी याच कंपनीने केली आहे. आता ‘मेट्रो २ ब’च्या तीन गाड्या मंडाळे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. आणखी काही गाड्या टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. मेट्रो गाड्या दाखल झाल्याने या मार्गिकेतील मंडाळे – चेंबूर असा टप्पा २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंडाळे – चेंबूर टप्पा सुरू करण्यात येणार आहे का याबाबत एमएमआरडीएच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
(हेही वाचा :NMMT: ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास, दिवाळीनिमित्त एनएमएमटीची भेट)
एमएमआरडीएचा बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्प
या प्रकल्पांतर्गत ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर बेस्ट, रिक्षा, टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.एमएमआरडीए मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. मात्र प्रवाशांना मेट्रोकडे आकर्षित करण्याचे मोठे आव्हान आहे. मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना इच्छित स्थळी जाणे सोपे झाल्यास मेट्रोला प्रतिसाद मिळेल असा विचार करून एमएमआरडीएने बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्पाची संकल्पना मांडली. हा प्रकल्प सर्व मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांमध्ये राबविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार आता ‘मेट्रो २ ब’मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. २३.६४३ किमी लांबीच्या या मार्गिकेवरील २० स्थानकांबाहेर २५० मीटर त्रिजेच्या आत बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण प्रकल्पाअंतर्गत बेस्ट,रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानक गाठणे वा मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी पोहचणे सोपे होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community