नाशकात शेंडी डोंगरावरून गिर्यारोहक कोसळले, २ जणांचा मृत्यू

139

नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील हडबीची शेंडी या डोंगरावरून गिर्यारोहक खाली कोसळले, या अपघातात २ गिर्यारोहक दगावले आहेत, तर एक गिर्यारोहक गंभीररित्या जखमी झाला आहे.

शेवटी ते तिघे राहिले आणि… 

अहमदनगरच्या इंद्रप्रस्त ट्रेकर्सच्या वतीने हडबीची शेंडी या डोंगरावर आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १८ जण यात सहभागी झाले होते, त्यात काही मुलींचाही सहभाग होता. दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण  झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले. शेवटचे तिघे जण उतरण्याच्या बेतात असताना तांत्रिक पथकाचा प्रमुख अनिल वाघ आणि मयूर मस्के हे दोघे खाली कोसळले, त्यातला एक जण जागीच गतप्राण झाला. जखमी प्रशांत पवार यास मनमाड येथे उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. या अपघाताचे वृत्त कळताच कातरवाडी येथील ग्रामस्थ भागवत झालटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित हडबीची शेंडीवर धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनीच राबविलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळपर्यंत खाली आणण्यात आले होते. मृतांचे शव मनमाड येथे आणण्यात आले, अशी माहिती मनमाड ते गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी ‘नासिक ट्रेकर्स’शी बोलताना दिली.

(हेही वाचा जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात अजूनही संघर्ष करतायत अनेक ‘लावण्या’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.