केरळच्या कथेने इस्लामिक धर्मांतराचे षड्यंत्र उघड केले आहे. त्यानंतर अनेक पीडित मुली स्वत: पुढे येऊन त्यांच्या कहाण्या सांगत आहेत. त्यापैकी एक अनघा! ही केरळच्या त्रिशूरची रहिवासी आहे. अनघाचेही तिच्या मुस्लिम मित्रांनीच ब्रेनवॉश केले होते. ‘द केरळ स्टोरी’ The Kerala Story पाहिल्यानंतर तिने या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात घडले, असे सांगितले.
अनघाने ‘रिपब्लिक इंडिया’ या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले, माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. माझ्या कुटुंबात माझ्या आई-वडिलांशिवाय मला दोन बहिणी आहेत. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि आर्शा विद्या समाजाची पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. ५ मे रोजी मी The Kerala Story चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून मला वाटले की, त्याची कथा माझ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. 2020 मध्ये अर्शा विद्या समाजममध्ये येण्यापूर्वी मी इस्लामचे अनुकरण करत होते. त्याच काळात मी धर्मांतर केले. त्यानंतर मी आर्शा विद्या समाजामध्ये सामील झाले.
(हेही वाचा The Kerala Story : अमरावतीत कोणतेही विरोध, निदर्शने नाहीत, पोलिस बंदोबस्तात ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित)
मला हिंदू धर्मविषयी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आई-वडिलांनीही दिली नाही
मला माझी धर्मांतराची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. त्या काळात मी माझा धर्म, खरा इतिहास आणि देशातील चालू घडामोडी याकडे दुर्लक्ष करून इस्लामला अधिक महत्त्व देऊ लागले. त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. माझ्या कॉलेजच्या दिवसात मी एर्नाकुलमच्या हॉस्टेलमध्ये होती. तिथे माझी मुस्लिम रूममेट मला हिंदू धर्माबद्दल विचारायची. माझ्या धर्मावर प्रश्नचिन्ह लावायची. त्यावेळी मला तिच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मला माझ्या धर्माबद्दल योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मी गप्प बसायची, असे अनघा म्हणाली. अनघा म्हणते, मी माझ्या पालकांशीही या प्रश्नांवर चर्चा केली, पण त्यांनीही मला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर मी सोशल मीडियावर शोध सुरू केला, पण तेथेही मला काही समाधानकारक आढळले नाही. मग मला हिंदू धर्माच्या वैधतेबद्दल शंका येऊ लागली. दुसरीकडे, जेव्हा मी माझ्या मुस्लिम रूममेटला इस्लामबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तिने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, कारण तिला लहानपणापासून इस्लाम शिकवला गेला होता. त्यांनी हिंदू धर्मावरही टीका केली, पण माझ्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती.
मला झाकीर हुसेन यांचे व्हिडीओ दाखवून धर्मांतर करायला उद्युक्त केले
पीडितेने पुढे सांगितले की, तिने मला सांगितले की ‘अल्लाह हा एकमेव देव आहे.’ ‘द केरळ स्टोरी’ The Kerala Story या चित्रपटातील मुख्य पात्राच्या बाबतीत जे घडते, तेच माझ्यासोबत खऱ्या आयुष्यात घडले. माझ्यावर हळूहळू माझ्या मुस्लिम मैत्रिणीचा प्रभाव पडू लागला. तिचे शब्द मला योग्य वाटले, त्यामुळे मी तिच्याकडून इस्लाम धर्म शिकू लागले. तिने मला अनुवादित कुराणही दिले. याशिवाय अधिक अभ्यासासाठी मला झाकीर नाईक, एमएम अकबर आणि काही लोकांचे व्हिडिओही दाखवले. त्याने मला वारंवार इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालण्याची सूचना केली आणि सांगितले की, जर तुम्ही तुमचे शरीर दाखवले तर अल्लाह तुम्हाला नरकाच्या आगीत टाकील. बुरख्यात राहणाऱ्या महिलांना अल्लाह नेहमीच मदत करतो. केरळच्या श्रुतीचेही अशाच प्रकारे धर्मांतर झाले होते. तिने सांगितले की, कॉलेजमध्ये पदवी घेत असताना मुस्लिम मैत्रिणीने तिचे ब्रेनवॉश केले होते. धर्मांतरानंतर तिला त्याला रेहमत हे नाव देण्यात आले. आणि इस्लाम स्वीकारल्यानंतर अनघाचे नाव आयमा अमीरा ठेवण्यात आले.
Join Our WhatsApp Community