देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधनापासून किराणा मालापर्यंत सगळे काही महाग झाले आहे. यातच आता डिझेल इंजिनावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे (Indian railway) तिकीट दर सुद्धा वाढवण्यात आले आहेत. डिझेल दरवाढीनंतर रेल्वे प्रशासनाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर १५ एप्रिलपासून तिकीट बुकिंग करताना लागू करण्यात येतील असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा : एसटी सुरु करा, नाहीतर खुर्ची खाली करा! शाळकरी मुलाची आर्त हाक )
५० रुपयांपर्यंत वाढणार दर
डिझेल इंजिनवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये १० ते ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. डिझेल इंजिनचा वापर करून अर्ध्याहून अधिक अंतरापर्यंत धावणाऱ्या गाड्यांवर हा अधिभार लागू असेल. ५० टक्के डिझेलवर धावणाऱ्या सर्व गाड्यांची यादी करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने विविध झोन्सला दिलेले आहेत.
- एसी क्लास (AC Coach) – ५० रुपये वाढ
- स्लीपर क्लास (Sleeper Coach) – २५ रुपये वाढ
- जनरल क्लास (General) – १० रुपये वाढ
कोकण रेल्वे प्रमाणेच आता हळूहळू ‘मिशन १०० टक्के अंतर्गत विद्युतीकरण – नेट झीरो कार्बन उत्सर्जन’ (Mission 100% Electrification) या अंतर्गत २०२४ पर्यंत सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य भारतीय रेल्वेने ठेवले आहे.
Join Our WhatsApp Community