राज्यात वाघांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वनमंत्री गणेश नाईक यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी वन विभागाला अवैध शिकाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना त्वरित राबवण्यास सांगितले आहे. (Tiger Death)
(हेही वाचा- जालना जिल्ह्यामध्ये 11 हजार बांगलादेशी, रोहिंग्यांचे वास्तव्य ; Kirit Somaiya यांची धक्कादायक माहिती)
वनमंत्र्यांनी अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, व्याघ्र संरक्षण दलातील विशेष पथकांना अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉग स्कॉडच्या मदतीनेही गस्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Tiger Death)
अतिसंवेदनशील जंगल परिसरात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, जेणेकरून वनाधिकाऱ्यांना त्वरित संपर्क साधता येईल. तसेच, सायबर सेलच्या मदतीने शिकारी घटनांमधील आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. (Tiger Death)
वाघांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे भ्रमणमार्ग, पाणवठे आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी विशेष तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. (Tiger Death)
(हेही वाचा- Ayodhya : ‘पुढील काही दिवस अयोध्येत येणे टाळा…’, राम मंदिर ट्रस्टने भाविकांना का केले न येण्यासाठी अपील ?)
वनमंत्र्यांच्या या कठोर निर्देशांमुळे वाघांच्या मृत्यूला आळा घालण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Tiger Death)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community