Tiger Death: महाराष्ट्रात चाललंय काय? 22 दिवसांत 11 वाघांचा मृत्यू; नेमकं कारण काय?

59

राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षणासाठी चिंतेचा विषय ठरत असलेली बाब म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केवळ २२ दिवसांत राज्यात ११ वाघांचा मृत्यू (Tiger Death) झाला आहे, दरम्यान वाघांचे मृत्यू हे वेगवेगळ्या कारणांनी झाले आहेत. (Tiger Death)

ताज्या घटनांमध्ये, २२ जानेवारीला वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) समुद्रपूर वनपरिक्षेत्रात एका वाघिणीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू नोंदवला गेला. याआधी २० जानेवारीला बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गावर रक्सौल एक्स्प्रेसच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.

या वर्षातील इतर प्रमुख घटनांमध्ये भंडारा जिल्ह्यात विजेच्या तारांमध्ये अडकून एका वाघिणीचा मृत्यू, यवतमाळमधील उकणी कोळसा खाण परिसरात एका वाघाची शिकार, आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Andhari Tiger Reserve) वाघांच्या लढाईत एका मादी बछड्याचा मृत्यू यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी सर्वाधिक मागणी)

ही आहेत कारणे

वाघांचा मृत्यू (Tiger Death) हे वेगवेगळ्या कारणांनी झाले आहेत. ज्यामध्ये अवैध शिकार, रेल्वे अपघात आणि नैसर्गिक कारणांचा समावेश आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, वाघांच्या मृत्यूची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. विशेषतः रेल्वे मार्ग (railway line) आणि रस्त्यांवर योग्य अंडरपास किंवा ओव्हरपासची सुविधा नसल्याने वन्यजीवांना धोका निर्माण होत आहे. अवैध शिकारीच्या घटनांमुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. वन्यजीव संरक्षणासाठी (Wildlife Conservation) तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.