चंद्रपूरात राजुरा येथील दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गावरील शुक्रवारी सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. चंद्रपूरात सलग दोन दिवस वाघाचे मृतदेह आढळून येत आहेत. गुरुवारी बल्लारशाह येथे टेहाळणी पथकाला जंगलात वाघाचा मृतदेह आढळला होता. शुक्रवारी सकाळी रेल्वेमार्गावर लांब पल्ल्याच्या रेल्वेची धडक लागून वाघाचा मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
(हेही वाचा – आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचा शिंदे-फडणवीसांकडून ‘सन्मान’; उद्धव ठाकरेंनी केली होती योजना बंद)
यंदाच्या वर्षांत राज्यात आतापर्यंत २१ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. रेल्वे मार्ग ओलांडताना वाघाला रेल्वेने धडक दिली. वाघाचा मृतदेह रेल्वेमार्गाची पहाणी करणा-या मजुरांना सकाळी सात वाजता आढळला. या प्रकाराबाबत रेल्वे अधिका-यांकडून माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघाच्या तोंडाला, दोन्ही पायांजवळ जबर जखमा झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
राजुरा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चुनाळा वनक्षेत्र परिसरातून रेल्वेलाईन गेली आहे. शुक्रवारी सकाळी पावणे आठ वाजता रेल्वे गँगमन गस्त घालीत असताना त्याला रेल्वे रुळाशेजारी वाघ मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर माहिती दिली. रेल्वे विभागाने वनविभागाला माहिती दिल्यावर घटनास्थळी उप वनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश येलकेवाड आणि क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते यांनी तातडीने दाखल झाले. सदर वाघ सुमारे तीन वर्षांचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community