उत्तराखंडमधील राजाजी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित झालेल्या वाघाचा हिमाचल प्रदेशातील रेणुका जंगलात शोध लागला. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातून शेकडो किलोमीटर अंतरावर वाघ स्थलांतर करतात, अशी माहिती शुक्रवारी राजाजी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक साकेत बडोला यांनी दिली.
कॅमेरा ट्रॅपमध्ये रेकॉर्ड केलेल्या प्रतिमांनुसार, या वाघाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राजाजी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतर केले होते. हा वाघ फेब्रुवारी महिन्यात पांवटा-रेणुका येथील सिंबलवाडा वन्यजीव अभयारण्यात असल्याची माहिती मिळाली होती. मे महिन्यात हरियाणातील कालेसर वन्यजीव अभयारण्यात असल्याचीही नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात तो हिमाचल प्रदेशच्या रेणुका जंगलात दिसला. त्यानंतर तो हिमाचल प्रदेशातील त्याच्या अधिवासाकडे परतत असल्याचेही कॅमेरा टॅपद्वारे दिसले होते. असल्याची माहिती बडोला यांनी दिली.
(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : रस्ते बांधकामात प्लास्टिकचा महापालिकेला पडला विसर)
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या वन अधिकाऱ्यांनी वाघाचा माग काढण्यासाठी काम केले. त्यामध्ये वाघाने आपला रस्ता चुकवला की स्वत:साठी नवीन अधिवासाच्या शोधात शेकडो किलोमीटरचे स्थलांतर केले हे स्पष्ट झालेले नाही.
बडोला पुढे म्हणाले की, नवीन अधिवासाच्या शोधात लांब पल्ल्याचे स्थलांतर करण्याची नर वाघांची प्रवृत्ती असते. जर त्यांना नवीन निवासस्थान सुरक्षित वाटले. तेथे मानवी वस्ती नसेल शिवाय अन्न आणि पाणी पुरेसे उपलब्ध असेल, अशा ठिकाणी ते वास्तव्य करतात नाहीतर ते पूर्वीच्या अधिवासाकडे जातात, अशी माहिती साकेत बडोला यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community