दहा वर्षांपूर्वी राज्यात अवघ्या तीन महिन्यात एक नाही तर तब्बल १९-२० वाघांची शिकार (Tiger Reserve) करणाऱ्या मध्य प्रदेशातील बहेलिया (Bahelia) शिकाऱ्यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात (Chandrapur) शिरकाव झाला आहे. या शिकारी जमातीचा म्होरक्या अजित राजगोंड याला महाराष्ट्र वनविभागाने (Maharashtra Forest Department) ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर राज्याला ‘रेड अलर्ट’ (Red Alert) देण्यात आला आहे. (Tiger Reserve)
हेही वाचा-Pune News : पुणे विभागाच्या मद्यपान तपासणी मोहिमेअंतर्गत तीन एसटी चालकांचे निलंबन
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आले. घटांग येथून झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणात शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात एक नाही तर तब्बल १९ वाघांची शिकार केल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले, पण यावेळी त्यापेक्षाही अधिक वाघांची शिकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर वनखात्यातील काही अधिकाऱ्यांनीसुद्धा याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. त्यावेळी याप्रकरणात सुमारे १५० शिकारी व आरोपींना अटक करण्यात आली. हे सर्व शिकारी मध्यप्रदेशातील वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया शिकारी गॅंगमधील असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा पाठपुरावा करून आरोपींना अटक करण्यात त्यावेळी स्थापन झालेल्या मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. (Tiger Reserve)
अजित, केरू आणि कुट्टू हे तीनही सख्खे भाऊ वाघांच्या शिकारीत तरबेज होते. अजित हा त्यावेळी नागपूर आणि परिसरात झालेल्या वाघाच्या शिकारीत ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोला माहिती दिल्यानंतर २०१४-१५ मध्ये त्याला तिरुपती येथून अटक करण्यात आली. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. अजितला याप्रकरणात शिक्षा झाली. ही शिक्षा पूर्ण करून तो बाहेर पडला. त्यानंतर अजितला १८ जुलै २०२४ ला मध्यप्रदेश वनखात्याने अटक केली. सप्टेंबर २०२४ मध्ये तो जामिनावर बाहेर आला. आता २५ जानेवारीला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे महाराष्ट्र वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. (Tiger Reserve)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community