TikTok Ban: भारतानंतर अमेरिकेत ही टिकटॉकवर बंदी कायम; सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्यास दिला नकार 

73
भारतात टिकटॉकवर (TikTok ban) सरकारने बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे भारताने या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली होती. भारताने देखील २०२० मध्ये टिकटॉक (TikTok) ॲपसह इतर ५९ चीनी ॲपवर बंदी घातलेली आहे. जगातील अनेक देश टिकटॉकवर बंदी घालत आहेत. दरम्यान, अमेरिकेत टिकटॉकवरील बंदीनंतर हे प्रकरण थेट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात गेलं होत. (TikTok Ban)

आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टिकटॉक ॲपवरील बंदीसंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. अमेरिकेत सुरक्षेच्या कारणामुळे अमेरिकेतील टिकटॉक ॲपवरील बंदी हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. टिकटॉक ॲप हे चिनी कंपनी बाइटडान्सच्या (ByteDance) मालकीचं असलेलं शॉर्ट-फॉरमॅट व्हिडीओ ॲप (TikTok video app) आहे. टिकटॉकवर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशात बंदी घालण्यात आलेली आहे. आता अमेरिकेतही टिकटॉक ॲपवर बंदी कायम करण्यात आल्यामुळे टिकटॉक ॲपच्या वापरकर्त्यांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

(हेही वाचा – रविवारी मुंबईकरांचे होणार मेगा’हाल’; लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर Mega block)

दरम्यान, या संभाव्य कराराबद्दल मस्क, टिकटॉक आणि बाईटडान्स यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार टिकटॉकची मूळ कंपनी असलेल्या बाइटडान्ससमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कंपनीने टिकटॉकची विक्री करावी किंवा 19 जानेवारी 2025 पासून अमेरिकेत टिकटॉक पूर्णपणे बंद करावे. अमेरिकेतील खासदारांकडून टिकटॉकला अतिरिक्त 90 दिवसांची मूदत देण्याची देखील मागणी केली जात होती. मात्र हे चाइनीज अ‍ॅप अमेरिकन नागरिकांची खासगी माहिती चोरत असून, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवड शनिवारी, बुमराहच्या सहभागावर साशंकता )

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर टिकटॉकचे भवितव्य अवलंबून

आता अमेरिकेत टिकटॉकचे भवितव्य हे आता निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प हे आधी राष्ट्राध्यक्ष असताना टिकटॉकच्या बंदीचं समर्थन केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी या प्रकरणावर भूमिका बदलली होती. त्यामुळे आता निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.