शनिवारपासून डिस्चार्ज रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून येत असल्याने कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या सोमवारी तीन लाखांचा टप्पा गाठेल, अशी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी तब्बल ४० हजार ८०५ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात आता २ लाख ९३ हजार ३०५ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुणे, नाशिक आणि नागपुरात रुग्णवाढ कायम आहे. त्या तुलनेत मुंबईनंतर आता ठाण्यात परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. परंतु रायगड आणि अहमदनगरमधील रुग्णसंख्या आता दहा हजारांच्या पुढे सरकली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखात आता रायगड आणि अहमदनगरचाही समावेश झाला आहे.
(हेही वाचा मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘धोकादायक’! मंगळवारपर्यंत आरोग्यासाठी ‘रेड अलर्ट’)
रविवारीची जिल्ह्यानिहाय एकूण सक्रीय रुग्ण संख्या
- पुणे – ८९ हजार ६७३
- ठाणे – ३८ हजार ५९७
- नागपूर – २३ हजार ७०१
- मुंबई – १९ हजार ८०८
- नाशिक – १६ हजार ६५३
- रायगड – १२ हजार ९१३
- अहमदनगर – १० हजार २४६
- रविवारी कोरोनामुळे नोंदवलेले मृत्यू – १३
- रविवारी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या – २७ हजार ३७७
- राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ७० लाख ६७ हजार ९५५
- राज्यात आतापर्यंत नोंदवलेल्या कोरोना रुग्णांची संख्या – ७५ लाख ७ हजार २२५