पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर पुणे मेट्रो नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. नागरिकदेखील मेट्रोला चांगला प्रतिसाद देत आहेत.
वेळापत्रक जाहीर
पिंपरी चिंचवड शहरात पीसीएमसी ते फुगेवाडी या पाच स्थानकांदरम्यान मेट्रो सुरू झाली आहे. तर पुणे शहरात वनाज ते गरवारे कॉलेज या पाच स्थानकांदरम्यान मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे वेळापत्रक जाहीर झाले असून पिंपरी चिंचवड शहरात दर अर्ध्या तासाला पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी आणि फुगेवाडी या स्टेशनवरून मेट्रो असणार आहे.
( हेही वाचा रविंद्र जडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ठरला सर्वोत्कृष्ट )
दिवसभरात इतक्या फे-या
सकाळी आठ वाजता मेट्रो सेवा सुरू होईल. रात्री नऊ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहील. पीसीएमसी आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशनवरून पहिली मेट्रो सकाळी आठ वाजता असणार आहे. त्यानंतर दर अर्ध्या तासाला मेट्रो असेल. एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर पोहोचण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ लागेल. पीसीएमसी स्थानकावरून सकाळी आठ वाजता निघालेली मेट्रो फुगेवाडीला 8.20 वाजता पोहोचेल. त्यामुळे नागरिकांना पीसीएमसी ते फुगेवाडी हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार करता येणार आहे. रात्री नऊ वाजता शेवटची मेट्रो असेल. दिवसभरात मेट्रोच्या 27 फेऱ्या होणार आहेत.
Join Our WhatsApp Community