BMC वर कर्ज घेण्याची येणार वेळ, रवी राजा यांनी अशी का व्यक्त केली भीती

3291
BMC वर कर्ज घेण्याची येणार वेळ, रवी राजा यांनी अशी का व्यक्त केली भीती

महापालिकडे जे पैसे आहेत, त्याचा कुठलाही विचार न करता त्याचा खर्च केला जात आहे. त्यामुळे मुळात महापालिकेकडे जे पैसे आहेत, त्याचा कुठलाही विचार न करता ते खर्च केला जात आहे. त्यासाठी मुदत ठेवी अर्थात एफडी मोडल्या जात आहे. त्यामुळे या एफडी मोडून सुरु असलेली उधळपट्टी अशीच सुरु राहिल्यास एक दिवस एफडी संपतील आणि त्यावेळेस उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे महापालिकेला कर्ज उभारण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी एक्स या समाज माध्यमावर व्यक्त करत राज्य सरकारला याचा विचार करण्याची विनंती केली आहे. (BMC)

मुंबईत एमएमआरडीएच्यावतीने मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण केले जात असून शहरांत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पांच्या खर्चातील २५ टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेने देण्याबाबतचा निर्णय सन २०१९ मध्ये तत्कालिन सरकारने घेतला होता. त्यानुसार मागील मार्च २०२४ रोजी एमएमआरडीएने सुमारे ५ हजार कोटींची मागणी केल असून यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने त्यांना अदा केली आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम देण्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून महापालिकेवर दबाव येत असल्याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एक्स या सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करून याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. (BMC)

(हेही वाचा – MMRDA-BMC : एमएमआरडीएचे उर्वरीत पैसे देण्यासाठी नगरविकास खात्याचा महापालिकेवर दबाव; आतापर्यंत दिले २ हजार कोटी रुपये)

रवी राजा यांनी या एक्सवर नमुद केलेल्या प्रतिक्रियेमध्ये असे म्हटले आहे की,

मुंबईत मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. त्यामुळे एमएमआरडीएने ५००० कोटी रुपयांची मागणी केली आहे. आधीच्या आयुक्तांनी २००० कोटी रुपयांचा एक पार्ट दिला आणि त्यासाठी ९५० कोटी रुपयांची एफडी मुदतपूर्व मोडली गेली.. आणि आता उर्वरित ३००० कोटी रुपयांसाठी नगरविकास खात्याकडून दबाव आणला जात आहे. मुळात महापालिकेकडे जे पैसे आहेत त्याचा कुठलाही विचार न करता ते खर्च केले जात आहेत. त्यासाठी एफडी मोडल्या जात आहेत. (BMC)

मुळात असे पैसे देणे आणि ते देखील लोकप्रतिनिधी महापालिकेत नसताना हेच मुळी चुकीचे आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कमी होत चालले आहेत. आणि त्यात वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे काम ही मुंबई महापालिकेला करायला लावले. जो जवळपास १८००० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. असे प्रकल्प खरंतर राज्य सरकारकडून होणे अपेक्षित आहेत,असे राजा यांनी म्हटले आहे. पण महापालिकेच्या एफडी मोडून ही उधळपट्टी सुरु आहे. लवकरच महापालिकेच्या एफडी संपतील आणि त्यावेळेस उत्पन्नाची साधनं नसल्यामुळे महापालिकेलाच कर्ज उभारायची वेळ येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करायला हवा, असेही राजा यांनी शेवटी नमुद केले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.