Tirupati Balaji Prasad : आता प्रसादातील भेसळ टाळण्यासाठी मोठ्या मंदिरांमध्ये मिळणार ‘हा’ प्रसाद

मंदिरांजवळ गोठा बांधून मातेची सेवा करावी आणि तिच्या दुधापासून बनवलेल्या वस्तूंचा प्रसाद बनवून भक्तांमध्ये वाटावा, असेही ठरवण्यात आले आहे.

69

तिरुपती बालाजी मंदिरातील नैवेद्यातील (Tirupati Balaji Prasad) भेसळीवरून देशातील संतापाची लाट उसळली आहे. अशीच भेसळ इतर मंदिराच्या प्रसादातही होत असणार, त्यामुळे आता यावर तोडगा काढण्यासाठी काशी विद्वत परिषद आणि अखिल भारतीय संत समितीसह काशीतील अनेक धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

(हेही वाचा सरकारी शाळेतील शिक्षिका आसमा आणि शगुफ्ता विद्यार्थ्यांना Namaz अदा करण्यासाठी करायच्या जबरदस्ती; शिक्षण विभागाने केले निलंबित)

तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादमध्ये (Tirupati Balaji Prasad) प्राण्याची चरबी आणि माशांचे तेल यांचा समावेश होता. ही बाब उघडकीस येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यामुळे आता यासाठी काशी विद्वत परिषदेने पुढाकार घेतला आहे. या मुद्द्याबाबत काशी विद्वत परिषदेने अखिल भारतीय संत समितीच्या सहकार्याने एक मसुदा तयार केला असून त्याअंतर्गत आता देशातील सर्व मोठ्या मंदिरांमध्ये पंचमेवा, बताशा, रामदाणे या वस्तू मंदिरांमध्ये राजभोग म्हणून अर्पण केल्या जाव्यात ज्यामुळे भेसळीचा धोका नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिरांना गोपालन करण्याची विनंती 

प्रसादात भेसळ होऊ नये आणि प्रसादाचे पावित्र्य राखले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या मंदिरांजवळ गोठा बांधून मातेची सेवा करावी आणि तिच्या दुधापासून बनवलेल्या वस्तूंचा प्रसाद बनवून भक्तांमध्ये वाटावा. जेणेकरून गोरक्षणासोबतच सनातन धर्माची उन्नती करता येईल. (Tirupati Balaji Prasad)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.