तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादासंदर्भात पुढे आलेली माहिती खरी असेल, तर हे सनातन धर्मियांच्या विरोधात सुनियोजित षडयंत्र आहे. त्यामुळे सरकारने मंदिरे अविलंब हिंदू मंडळाच्या अखत्यारित आणावी, असे प्रतिपादन मध्यप्रदेशातील बागेश्वर बालाजीचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी केले. (Tirupati Prasadam)
(हेही वाचा – Railway Accident : गुजरातमध्ये रेल्वे घातपाताचा प्रयत्न उघडकीस)
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, दक्षिण भारतात तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) प्रसादाचा भाग म्हणून चरबीयुक्त तुपाचे लाडू वाटल्याची माहिती खरी असेल, तर तो मोठा गुन्हा आहे. भारतीय सनातन्यांविरुद्ध हे निश्चितच सुनियोजित षडयंत्र आहे. हा प्रकार करून भारतातील सनातनी धर्म भ्रष्ट करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. याची बारकाईने चौकशी झाली पाहिजे. तिथल्या सरकारने कडक कायदे करावेत आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी असे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.
यासोबतच सरकारने तातडीने हिंदू मंदिरे हिंदू मंडळाच्या अखत्यारीत टाकावीत, जेणेकरून कोणत्याही सनातनींच्या श्रद्धेला धक्का पोहोचू नये. भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांचा सविस्तर सनातनी तपास व्हावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी संघटित होऊन तयार रहावे, असेही त्यांनी सांगितले. (Tirupati Prasadam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community