तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूच्या (Tirupati Prasadam) प्रसादात प्राण्यांच्या चरबीत भेसळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही गंभीर बाब असल्याचे आत्मसन्मान मंचाने म्हटले आहे. यासंदर्भात आत्मसन्मान मंचचे नित्यानंद शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ‘या घटनेमुळे देश-विदेशातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
(हेही वाचा – Kala Ghoda परिसरातील पाच मार्ग शनिवार, रविवार सायंकाळी सहा पासून राहणार बंद; या रस्त्यांचे होणार सुशोभीकरण )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलेल्या पत्रात नित्यानंद शर्मा यांनी म्हटले आहे की, तिरुपती बालाजी मंदिरातील घटना लक्षात घेता संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि राज्यात अशी घटना घडू नये, यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डीचे श्री साई बाबा मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, तुळजापूरमधील श्री भवानी मंदिर आणि इतर प्रमुख मंदिरांमधील अर्पणांची गुणवत्ता तपासावी, जेणेकरून वेळेवर खबरदारी घेत भक्तांच्या भावनांचा आदर केला जाईल, अशी मागणी आत्मसन्मान मंचचे अध्यक्ष नित्यानंद शर्मा यांनी केली आहे. (Tirupati Prasadam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community